WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विधवा सुनेवर सासरा खाऊन होता खार, मध्यस्थी करणाऱ्या भावावर केला चाकूने वार !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

नातेसंबंधातील व्यक्तीला चाकू मारून जख्मी केल्याची घटना आज २२ जानेवारीला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मारेगाव (कोरंबी) येथे घडली. गावात का आली म्हणून अश्लील शिवीगाळ करीत विधवा सुनेच्या अंगावर चालून आलेल्या सासऱ्याला अडविण्याकरिता गेलेल्या सुनेच्या भावाला सासऱ्याने चाकू मारून जख्मी केले. संतोष माधव पिंपळकर (२८) रा. लाठी असे या चाकू हल्ल्यात जख्मी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या तक्रारीवरून चंद्रभान रामजी भुसारी (५०) रा. मारेगाव (कोरंबी) या हल्लेखोर व्यक्ती विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाकूचे वार चुकवितांना तळहातावर चाकू लागल्याने संतोष पिंपळकर याला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

तालुक्यातील लाठी येथे राहणाऱ्या संतोष पिंपळकर याच्या मोठ्या बहिणीचे लग्न मारेगाव (कोरंबी) येथील महादेव भुसारी याच्या सोबत २००८ मध्ये झाले होते. तिचा पती २०१८ मध्ये व्ह्रदयविकाराने मरण पावला. त्यानंतर सासरा चंद्रभान भुसारी तिला नेहमी त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने चार महिन्यापूर्वी सासर सोडले व ती मुलाबाळांसह माहेरी राहू लागली. महिलेचे राशन कार्ड मारेगाव (कोरंबी) चे असल्याने ती आपल्या भावासह २२ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता कंट्रोल मधून अनाज आणण्याकरिता मारेगाव (कोरंबी) येथे गेली असता तिचा सासरा गावात का आली म्हणून अश्लील शिवीगाळ करीत तिच्या अंगावर चाल करून येत असतांनाच मध्यस्थी करण्यास गेलेल्या भावावर तिच्या सासऱ्याने चाकूने वार करून जख्मी केले. तसेच यापुढे गावात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. विधवा बहिणीच्या गुंड प्रवृत्तीच्या सासऱ्यापासून आमच्या जीवितास धोका असल्याची तक्रार महिलेचा भाऊ संतोष पिंपळकर याने पोलीस स्टेशनला नोंदविली. याआधीही महिलेने सासरा विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली होती.

स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणण्याकरिता गेलेल्या सुनेला अश्लील शिवीगाळ करीत अंगावर चाल करणाऱ्या सासऱ्याला सोबत असलेल्या भावाने अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरच चाकूने हल्ला चढविणाऱ्या चंद्रभान भुसारी याच्या विरुद्ध संतोष पिंपळकर याने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी चंद्रभान भुसारी याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.