WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कांग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली-माजी आमदार कासावार

Image

सुरज चाटे - वणी शहर कांग्रेस कार्यकारिणी व शहर कांग्रेस सेवादल कार्यकारिणी निवड प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी विचार व्यक्त करताना सांगितले, परंतु सर्व प्रथम त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदाना श्रद्धांजली अर्पण केली व देशाची लोकशाही सुदृढ झाली असेल व येथील उपेक्षित माणूस जर सन्मानाने जीवन जगत असेल तर भारतीय कांग्रेस पक्षामुळे त्यामुळे कांग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यानी व पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे हा देश सर्वांसाठी महत्वाचा आहे तसेच पक्ष सुद्धा सर्वधर्मसमभावाने काम करीत आहे तेव्हा पक्षाचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

वणी येथील माजी आमदार वामनराव कासावार यांचे इंदिरा गांधी चौकातील निवासस्थान वणी येथे दिनांक 2 मार्च 2019 ला सायंकाळी 5 .00 वाजता वणी शहर कांग्रेस कमिटीची कार्यकारिणी व पदाधिकारी निवड तसेच शहर कांग्रेस सेवादल या दोन्ही कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची निवड माजी आमदार वामनराव कासावार व उपस्थित मान्यवरांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन पुष्पहाराणे सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार वामनराव कासावार , देविदास काळे, राकेशभाऊ खुराणा, विवेक मांडवकर, शहर कांग्रेस अध्यक्ष प्रमोद निकुरे, शहर कांग्रेस सेवादल अध्यक्ष प्रमोद लोणारे, रफिकभाई रंगरेज,सुनीलभाऊ वरारकर, प्रा टीकाराम कोगरे, अडव्होकॅटे राजीव कासावार, प्रमोद वासेकर , आबीद हुसेन, प्रशांत गोहोकार, उत्तमराव गेडाम, शालिनीताई रासेकर, वंदना धगडी,उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे यांनी कांग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्य कार्यकर्त्या पर्यंत पोहचवून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करू यावेळी त्यांनी पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी यांच्या नावांचा उल्लेख करून सन्मानाची पावती दिली यातून पक्षाच्या बळकटीसाठी एकनिष्ठेने प्रामाणिकपणे कार्य करू असे मत व्यक्त केले . तसेच विवेक मांडवकर, देविदास काळे ,प्रा टीकाराम कोगरे, रफिकभाई रंगरेज, आबीद हुसेन, यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेशभाऊ बनसोड यांनी केले तर आभार शरदभाऊ मंथनवार यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वणी शहर कांग्रेस कमिटीच्या व सेवादलच्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share