WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कंटेनर-ट्रक ची सामोरा समोर धडक....

Image

तीन गंभीर :- उपचारार्थ दवाखान्यात दाखल...

सुरज चाटे वणी - यवतमाळ राज्य महामार्गावर गौराळा मायनिंग लगत शुक्रवारी दिनांक 1 मार्च रोजी सिमेट टँकर व ट्रकची समोरासमोर टक्कर होवुन तीन पुरुष जखमी झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान घडली आहे, अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

वणी वरुन यवतमाळ कडे गठान भरुन जाणारा ट्रक क्रमांक एम एच २९ टी १७९३ व यवतमाळ वरुन येणारा सिमेंट टँकर क्रमांक एम एच ३४ बी जी ९४७७ या दोन्ही वाहनाची राज्य महामार्गावर असलेल्या गौराळा मायनिंग जवळ समोरासमोर टक्कर होवुन सैय्यद समिर वय (२७),बिसमिल्लाखान मनोहर पठाण वय (५०),दोघेही राहणार यवतमाळ,व गुणवंत सोनकुसरे वय (२१) बाबुपेठ चंद्रपुर जखमी झाल्याची घटना सहा वाजताचे सुमारास घडली.गुणवंत यास चंद्रपुर येथे पुढील उपचाराकरीता चंद्रपुर येथे हलविण्यात आले असुन उर्वरीत दोघांवर शासकीय ग्रामिण रुग्णालय मारेगाव येथे उपचार सुरु आहे..अपघात झाल्याची माहीती मिळताच जमादार आर पी वेट्टी हे घटनास्थळी जावुन अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले, पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share