WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सावरकर शाळेत स्वातंत्र्यवीरांची पुण्यतिथी व बक्षीस वितरण

Image

सुरज चाटे वणी:- येथील स्वा. सावरकर नगर परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा क्र. 5 मध्ये स्वा. सावरकरांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद वणीच्या शिक्षण सभापती रंजुताई झाडे या होत्या. प्रमुख वक्ते म्हणून शिक्षण तज्ञ डॉ. प्रा. प्रशांत गावंडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, नगर सेविका वर्षाताई खुसपुरे, विस्तार अधिकारी लक्ष्मण इद,दे, पंचायत समितीचे साधन व्यक्ती विनोद नासरे, संतोष काळे, देवराव चिडे, माजी मुख्याध्यापक रमेश खडसे, दिनकर ढवस प्रामुख्याने उपस्थित होते.

सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन केल्या नंतर प्रास्ताविक शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना डॉ. प्रशांत गावंडे म्हणाले की,स्वातंत्र्यवीर हे ज्वाजल्य देशभक्त होते, महान क्रांतिकारक होते, महाकवी होते, समुद्रातील त्यांची उडी त्रिखंडात गाजली हे सर्व बरोबर आहे. पण त्यापेक्षा शिक्षण क्षेत्रासाठी महत्वाचे म्हणजे सावरकर हे भाषा प्रभू होते. ते प्रखर विज्ञानवादी होते. शिक्षण क्षेत्रातील लोकांनी इंग्रजी माध्यमाचे भूत उतरविण्यासाठी सावरकरांचे विचार अंगी बाळगणे अतिशय महत्वाचे आहे ही काळाची गरज आहे. शिक्षण सभापती रंजुताई झाडे म्हणाल्या की, मराठीतून शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी अतिशय आवश्यक झाले आहे. मोठ्यांचा आदर व लहानांची कदर अशा सह शालेय उपक्रमातून साध्य होते असे प्रतिपादन त्यांनी केले. सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त या शाळेने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य असून पालक मेळावा व त्यांची कार्यशाळा ही आता शाळेची गरज झाली आहे. असे विचार गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी मांडले

त्यानंतर लक्ष्मण इदे,दे, रमेश खडसे, दिनकर ढवस यांनी प्रसंगानुरूप प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रसंगी स्वा. सावरकर प्रेमी मित्र मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा, स्नेह संमेलनानिमित्त पालक व विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश तुंबडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रेमदास डंभारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मीना काशीकर, रजनी पोयाम, गीतांजली कोंगरे, दर्शना राजगडे यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share