WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

स्वा. सावरकर शाळेत पुण्यतिथी व आई वडिलांची कार्यशाळा

Image

वणी:- येथील स्वा. सावरकर नगर परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा क्र.5 मध्ये शालेय स्तरावर उत्कृष्ठ शिक्षण देण्यासोबत वर्षभर शालेय व सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 26 फेब्रुवारीला स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आई वडिलांच्या कार्यशाळेचे, मुलांसोबत आई वडिलांचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

सावरकर शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. प्रा. प्रशांत गावंडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, मुख्याधिकारी संदीप बोरकर, शिक्षण सभापती रंजुताई झाडे, बांधकाम सभापती राकेश बुग्गेवार, आरोग्य सभापती शालिकराव उरकुडे, जलपूर्ती सभापती प्रीतिताई बिडकर, महिला व बाल कल्याण सभापती मायाताई ढुरके, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, नगर परिषद सदस्य नितीन चहानकर, वर्षाताई खुसपुरे प्रशासन अधिकारी संजय पवार उपस्थित राहणार आहेत.

स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाल्यानंतर डॉ. प्रशांत गावंडे आई वडिलांची कार्यशाळा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी विद्यार्थी व पालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मोहसीना खान, मुख्याध्यापक गजानन कासावार व शिक्षक वृंदानी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share