WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पथनाट्य द्वारे जनजागृती..... विद्यार्थ्यांकडून गाडगे महाराजांच्या विचाराचे सादरीकरण... .....

Image

वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने आज दि.23/02/2019 संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वणी शहरातुन शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबाच्या दशसुत्री विचारावर आधारीत पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातुन वणीकर जनतेला संदेश देण्यात आला. रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. किशन घोगरे यांनी शोभायात्रेचे आयोजन केले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ अरुंधती निनावे यांनी मार्गदर्शन केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share