WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रामदेवबाबा माघ उत्सव जल्लोषात साजरा

Image

दिनांक 6 व 7 फेब्रुवारी रोजी चिखलगांव लगतच्या रामदेवबाबा देवस्थान येथे माघ शु दुज जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यामध्ये हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतले. सकाळी रामदेवबाबाचे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर कात्री ता. कळंब येथील रवीकुमार चोरडिया यांच्या हस्ते होम झाले. ध्वजा दिनेशजी शर्मा तर श्रींगार यवतमाळ येथील व्यास यांच्या हस्ते झाला.मंदीरात झालेली सजावट आकर्षणचा केंद्रबिंदू होते. समुद्रपूरचे विरेंद्रजी सिसोदिया व गोपाल जोशी यांनी सजावट ची जवाबदारी सांभाळली. हजारो भाविकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला. सत्यनारायण गुप्ता, नागपूर यांच्यातर्फे देण्यात आले. वणी विधानसभा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवर पं.स. सभापती संजय पिंपलशेडे व ग्राम पंचायत सदस्य यांनी रामदेवबाबाचे दर्शन घेतले. रामदेव बाबा उत्सव समिती ची पदाधिकारी यांनी दिवसरात्र परिश्रम केले. तसेच भाविकांसाठी शासन कडून मंजूर झालेले विकासकामे त्वरित सुरु करण्यात येईल असे समितीचे ऍड अतिष कटारिया यांनी सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share