WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रहार विद्यार्थी संघटना वणी तर्फे अन्नदान आणी वृक्षारोपण...शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम ...

Image

वणी - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.या वेळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुजा करण्यात, आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना वणीचे तालुका प्रमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 'भुकेलेल्यांना भाकर हक्काची' भुकेलेल्यांना अन्नदान हा संत गाडगे बाबांनी दिलेला मुलमंञ होता परंतु आजच्या धावपळीच्या व विज्ञानाच्या युगात कोणीही ख-या भूकेलेल्यांना अन्नदान करतांना आढळून येत नाही. असे मत अनिकेत चामाटे यांनी यावेळी व्यक्त केले.वरोरा रोड वणी येथे अन्नदान आणी वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अनिकेत चामाटे, उपतालुका प्रमुख मा.साई नालमवार, तालुका सरचिटणीस मा.भीमा खोब्रागडे ,शहर संघटक, मा.गणेश देवाळकर,तालुका संपर्क प्रमुख मा.वृषभ तुराणकर, व प्रहारचे इतर कार्यकर्ते व परिसरातील नागरिक हजर होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share