WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३१ डिसेंबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस रोडवरील निसर्ग पार्क जवळ घडली. दिनेश शंकर कंडे (२८) रा. राजूर कॉलरी असे मृतकाचे नाव असून तो राजूर वरून चंद्रपूर येथे असल्याचे समजते. मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला.

घरच्यांना चंद्रपूरला जात असल्याचे सांगून दुचाकीने चंद्रपूरकडे निघालेल्या युवकाचा वणी घुग्गुस रोडवरील निसर्ग पार्क जवळ अपघात होऊन करून अंत झाला. सदर युवक आपल्या दुचाकी क्रं MH २९ Z ५०९० ने चंद्रपूर कडे जात असतांना मागून येणाऱ्या चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रक क्रं MH ३४ AB ८९७८ ने जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. राजूर येथील वेकोलीच्या कॉटर मध्ये राहणाऱ्या या युवकाचे शिक्षणाबरोबरच नोकरीसाठीही प्रयत्न सुरु होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या असलेल्या या युवकाच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदना नंतर पार्थिव शरीर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. ट्रक चालका विरुद्ध पोलिसांनी भादंवि च्या कलम २७९, ३०४(क) नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले