WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जीवनचरित्र पुस्तिका भेट देऊन थोर पुरूषांची जयंती साजरी..शासकीय परिपत्रकांचे केले पालन.....

Image

सुरज चाटे वणी - दि.२०-२-१९ ला शासकीय परिपत्रकानुसार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शाळा क्र.७ येथे संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज जयंती निमित्ताने संत रविदास महाराज प्रतिमा व संत रविदास महाराज यांची जीवनचरित्र पुस्तिका भेट देऊन विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले.

संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच च्या वतीने गरीब विद्यार्थ्याना शालेय ड्रेस देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापीका गोवारदीपे म्याडम.तर प्रमुख पाहुणे म्हणुन हेमंत जी वाघमारे. मंगेश(बालु)रासेकर व दूमोरे सर होते. तर सूत्रसंचालन परेकर सर यांनी केले. तसेच संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच वणी चे सदस्य विनोद जी ढेरे.किशोर हांडे.किशन कोरडे.शाम गिरडकर.अमोल बांगडे.वैभव उपाध्ये.अनिकेत वाघमारे व सर्व शिक्षक व्रुन्द व विद्यार्थी उपस्तीथ होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share