WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रा डॉ आनंद तेलतुंबडे वरील खोटे गुन्हे रद्द करावे- माकपची मागणी

Image

● कॉ गोविंद पानसरे यांचे स्मृतिदिनाला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

________________________

सुरज चाटे वणी :- प्रा डॉ आनंद तेलतुंबडे हे वणी तालुक्यातील राजूर येथील असून त्यांनी जागतिक स्तरावर आंबेडकरी व मार्क्सवादी विचारवंत म्हणून नावलौकिक मिळविला असून अशा विचारवंतावर पुणे पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आले. याचा निषेध करीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनाला वणी येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.

भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असून त्यानुसार देशातील व्यवस्थेवर, अन्यायावर, शोषणाविरुद्ध तसेच सरकारचा धोरणाविरुद्ध आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात असे मत व्यक्त करणाऱ्यांवर काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून सातत्याने विचारवंतांवर प्रहार केले जात असून त्यामध्ये कॉ गोविंद पानसरे, डॉ नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी व गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली आहे. ह्याचे आरोपी अजूनही मोकाट असून खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत. तर दुसरी कडे जागतिक मान्यता प्राप्त झालेले प्रा डॉ आनंद तेलतुंबडे ज्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विचार लेखन-भाषणातून मांडलेले आहेत व त्यांचे विचार हे भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता व बंधुभावाच्या मूल्यांचे त्यामधील लोकशाही धर्मनिरपेक्ष तत्वांचे अविष्कारणच नव्हे तर परिपोषण केले आहेत यांचे वर पोलीस कारवाई करण्यात आली.

भारतीय संविधानातील मूल्यांवर निर्भेळ आस्था असणाऱ्या प्रा डॉ आनंद तेलतुंबडे वर त्यांचे विचार देशातील प्रस्थापित राजवटीचे समर्थन करणारे नसल्याने त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे राजकीय डाव असल्याचे दिसते. त्यामुळे माकप प्रा डॉ आनंद तेलतुंबडे यांना भयमुक्त वातावरणात आपले वैचारिक कार्य करण्यापासून वंचित करू नये व कॉ पानसरे, डॉ दाभोलकर यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी आपले शौर्य कामाला लावावे अशी मागणी केली आहे.

या वेळेस माकपचे सर्व कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, चंद्रशेखर सिडाम, कवडू चांदेकर, किसनराव मोहुर्ले, सुदर्शन टेकाम, सुधाकर सोनटक्के,प्रभाकर बावणे,संजय कोडापे, शंकर गाऊत्रे, भीमराव उईके, राजहंस बुजाडे, विनायक कोवे,संदीप सुरपाम, मंगेश सरोदे, दिनकर सरोदे, रामदास कुमरे, राजेंद्र कनाके, गुलाब मेश्राम, देवराव टेकाम, मारोती टेकाम, महादेव टेकाम, विठ्ठल आत्राम, विनोद पुसनाके, प्रभाकर मडावी, उदयभान आत्राम,शंकर चिकाराम, संभा किनाके आदी हजर होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share