WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जीवनधाराला अपंग विकास शिवरत्न पुरस्कार प्रदान......

Image

पुणे येथे सत्कार ;- विविध क्षेत्रातील प्रशंसनीय कार्याची घेतली दखल...

सुरज चाटे वणी :- पुणे येथील पत्रकार भवन, नवीपेठ मध्ये १९ फेब्रुवारी ला दुपारी ३ ते ६ या वेळात प्रेरणा साहित्य व कवी संमेलनाचे आयोजन इंटरनॅशनल ह्यूमन रिसर्च पब्लिकेशन, साप्ताहिक कोकणभूमी व नॅशनल कार्पोरेट स्पीकर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये कवी संमेलन, उत्कृष्ट 50 पुस्तकांचे प्रकाशन व प्रेरणा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते त्यात यवतमाळ जिल्यातील जीवनधाराला अपंग विकास शिवरत्न पुरस्कार देऊन सन्मानीय करण्यात आले गजेंद्र वावगे प्रोजेक्ट डायरेक्टर जीवनधारा बहुउद्देशीय संस्था यांनी डॉ. प्रितेश बत्तलवार यांच्या वतीने सदर पुरस्कार स्वीकारला.

महाराष्ट्र। मधील तळागाळातील विशेष कार्य करणाऱ्या कार्यपुरुषांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, महाराष्ट्रात सेवा देणाऱ्या विविध संस्थांची दखल घेण्यात आली असून त्यांच्या कार्याची जणू पावती त्यांना दिली असून, यात जीवनधारा बहुउद्देशीय संस्था यांची अपंग विकास शिवरत्न राज्यस्तरीय पुरस्कार या मानाच्या गौरवास निवड झाली होती त्यात जीवनधारा संस्था अविरत जनतेच्या सेवेत राहून कार्य करीत असून दिव्यांग व गरजूंना नेहमी आपल्या मायेची ऊब देत त्यांना जमेल त्या पद्धतीने संगे घेऊन मदतीचा हाथ देत असते अशा या कामाची पावतीच जणू त्यांना प्रेरणा साहित्य व कवी संमेलनाचे आयोजन इंटरनॅशनल ह्यूमन रिसर्च पब्लिकेशन, साप्ताहिक कोकणभूमी व नॅशनल कार्पोरेट स्पीकर, पुणे यांनी दिनांक 19 ला केले होते त्यात गजेंद्र वावगे प्रोजेक्ट डायरेक्टर जीवनधारा बहुउद्देशीय संस्था यांनी डॉ. प्रितेश बत्तलवार यांच्या वतीने सदर पुरस्कार स्वीकारला सदर संस्थेला मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले त्यांचे सर्व स्थराहुन स्वागतच होत आहे.

जीवनधारा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री प्रफुल जी खडसे , उपाध्यक्ष डॉ. संदिप वानखडे , सचिव डॉ. प्रितेश मल्हारी बत्तलवार ,सहसचिव कु. कोमल कार्तिक राव उमरे सदस्य कु. बिनाताई पुल्लरवार, श्री. जिबरील खान, श्री. प्रणीत बत्तलवार, श्री. सूरज चाटे, श्री. अखिन आचार्य आदी सदस्य गण निस्वार्थ सेवा करीत असून जणू गोरगरीबांची सेवा करण्यात त्यांना आनंद मिडतो असेच यावेळी जीवनधाराच्या संघाने बोलून दाखविले असून आणखी जोमाने कार्य करण्याची तयारी संपूर्ण संगाची दिसून येत असून या पुरस्काराने जणू संजीवनीच मिळाल्याचे दिसून येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share