WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीच्या गौरव ने मारली बाजी... राज्यस्तरीय स्पर्धेत पटकाविला पुरस्कार.....

Image

वणी येथे प्राथमिक शिक्षण घेऊन नागपूर ला विधी शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या गौरव चंद्रशेखर खोंड याला लहानपणा पासून नाट्य कलेची आवड होती. त्याने अनेक नाट्य स्पर्धेत पुरस्कार प्राप्त केले आहे.

नुकतीच नागपूर महानगरपालिका व अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखेच्या महापौर करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत सी.पी. अँड बेरार,नागपूर च्या ' अनोळखी ओळख ' या एकांकिकेने तृतीय क्रमांक प्राप्त केला व 21 हजार रुपये रोख देण्यात आले. अनोळखी ओळख दिग्दर्शन उतेजनार्थ तृतीय व स्त्री अभिनय द्वितीय अश्विनी गोरले तसेच उच्च न्यायालयात विधी तज्ञा वणीचा गौरव खोंड याने पुरुष अभिनय द्वितीय प्राप्त केला आहे. या एकांकिकेला नेपथ्य चे तृतीय पवन कर्णे व पार्श्व संगीत द्वितीय अंकित गोरले याला प्राप्त झाले.

अतिशय चुरशीची ही स्पर्धा होती. वणी शहराचे नाव गौरव ने नागपूर मध्येच नाही तर महाराष्ट्र मध्ये पोहचवले. त्यामुळे सर्वत्र त्याचे व पूर्ण संघाचे कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share