WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उपवर-वधू परिचय मेळाव्यातून समाजातील आर्थिक विषमता नष्ट होईल - कल्याण दळे

Image

वणी - येथील विदर्भ स्तरीय उपवर - वधू परिचय मेळाव्याला मार्गदर्शन करताना कल्याण दळे म्हणाले समाजामध्ये असलेली हुंडा पध्दतीला मूठ माती देवून उपवर-वधू परिचय मेळाव्यातून वधूपसंती केवळ नौकरी असणारा जोडीदार न निवडता मुलगा नौकरीत असेल तर सर्वसामान्य कुटुंबातील जोडीदार म्हणून स्वीकारावा किंवा मुलगी नौकरी करीत असतील तर त्यांनी आपल्यापेक्षा जास्त प्याकेज कमवणारा जोडीदार हवा असणार अशी अपेक्षा न करता समाजातील होतकरू मुलगा स्वीकारावा तरच समाजातील आर्थिक विषमता नष्ट होईल असे मत व्यक्त केले. वणी येथील शेतकरी मंदिरात 7 वा विदर्भस्तरीय उपवर - वधू परिचय मेळावा महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणी व जिल्हा समितीच्या वतीने आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कल्याणजी दळे हे होते. उदघाटक इंदिरा सुतगीरणीचे अध्यक्ष सुनीलभाऊ कातकडे ,प्रमुख मार्गदर्शक लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी तसेच आमदार बाळूभाऊ धानोरकर,विजय धारकर, मनोहर पाऊणकर , सौ संगीता खटोड, नारायण गोडे, अरुण नक्षीने, नीलकंठ तायडे, संजय नक्षीने, पुंडलिक कुबडे, आशिष खुलसंगे, अंबादास धानोरे, बंटी ठाकूर, गणपत लेडाँगे, संजय निखाडे, उपस्थित होते.याप्रसंगी विचार व्यक्त करताना प्रमुख मार्गदर्शक भावनाताई गवळी म्हणाल्या समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडून त्या प्रभावीपणे सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच सभागृहासाठी जागा अधिकृत करावी व त्यासाठी पाहिजे तेवढा निधी देईल अशी ग्वाही दिली. तसेच मान्यवरांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात 60 मुलांनी तर 70 मुलींनी आपला परिचय दिला . यावेळी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना नाभिक समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सरोजताई चांदेकर चंद्रपूर यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष शशिकांत नक्षीने यांनी मानले . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी निखिल मांडवकर, बंटी खटले, विनोद धाबेकर, स्वप्नील धुर्वे, प्रभाकर कडुकर, प्रजवल नागतुरे, सूरज नक्षीने, लक्ष्मन नक्षीने, बाळूभाऊ कडुकर, अभय नागतुरे, जितेंद्र घुमे, बालाजी नागतुरे, निकेश कडुकर, गणेश मांडवकर, सागर वाटेकर, गोविंदा खटले, पांडुरंग नागतुरे, सुभाष तेजे , यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share