WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूर येथे संत रविदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Image

राजूर: राजूर येथे रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज व समतेचे अग्रदूत संत रविदास महाराज जयंती निमित्य राजूरवासीयांतर्फे गावातील शहिद भगत सिंग चौक येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. अखिल भारताला समतेचा संदेश देणारे संत रविदास व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,जाणते राजे शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती अभिवादन कार्यक्रमात माजी पं.स. सदस्य मा.अशोकजी वानखेडे,मा. गोवर्धन दुर्योधन ,मा. जयंतजी कोयरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण केले. या अभिवादन कार्यक्रमाचे संचालन महेश लिपटे सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी राजूरचे पोलीस पाटील सरोज मून,साजिद खान,प्रदिप बांदूरकर, जावेद भाई, नौशाद अहमद,सुनिल कोयरे,कांबडे सर,निमसटकर सर,बाबू कुक्कलवार,गोपाल चितपल्लीवार,मनिष झाडे,रजा हसन,रतन राजगडकर,प्रविण पाटिल,अक्षय गावंडे,आशा जंगले,अश्विनी जंगले व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share