WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बेलदार समाजाकडून शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

Image

सुरज चाटे वणी - येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवार चौकात *बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी तथा बेलदार समाज बंधु-भगिनींतर्फे जम्मु काश्मीरमधील पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवानांना मेणबत्ती पेटवून व फुले अर्पण* करून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी प्रदीप बोनगीरवार, अशोक आकुलवार, दिलीप कोरपेनवार, न.प. बांधकाम सभापती राकेश बुग्गेवार, सुंकरवार सर, ज्ञानेश्वर बोनगीरवार, गजानन चंदावार, राकेश बरशेट्टीवार, संदिप मुत्यलवार, रोहन आदेवार, स्मिता ताटेवार, सीमा बोनगीरवार यांनी पुलवामा येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच शहिद जवानांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांनी *शहीद जवान... अमर रहे अमर रहे, पाकिस्तान... मुर्दाबाद, भारत माता की... जय* अशा घोषणा देण्यात आल्या. शेवटी राष्ट्रगीत घेऊन श्रद्धांजलीचा कार्यक्रम समाप्त करण्यात आला. यावेळी किशोर मुत्यलवार, पवन सिद्धमशेट्टीवार,दिपक बातमवार, मुत्यलवार, अनिल ठाकूरवार, सुरेश चिट्टलवार, सागर बरशेट्टीवार, दिपक मैदमवार, संदिप दासरवार, नितेश मदीकुंटावार,विलास मूत्यलवार,अभिजित आयतवार, काजल पुरमशेट्टीवार, रेखा बोनगीरवार, वैशाली मारगमवार, मधुश्री चंदावार,विशाखा बाचिकवार, विना मसेवार, सुनीता पानघंटीवार, सिमा सुगरवार, नंदा मसेवार, सारिका सिध्दमशेट्टीवार, मेघा मसेवार आदी बेलदार समाजबांधव-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share