WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बेलदार समाज महिला स्नेहमिलन सोहळा ..... पुलवामा येथील शहिदांना दिली श्रद्धांजली...

Image

सुरज चाटे वणी : बेलदार समाज महिला स्नेहमिलन सोहळा गणपती मंदिर, बेलदारपूरा, वणी येथे आयोजित करण्यात आले होते. काश्मीर मधील पूलवामा हल्यातील शहिदांना श्रध्दाण्जली देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सीमाताई बोनगिरवार, प्रमुख पाहुणे छायाताई मूत्यलवार, रेखाताई बोनगिरवार,मधुश्री चंदावार होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेखाताई बोनगिरवार यांनी केली. संचालन काजल पुरमशेट्टीवार यांनी तर आभार प्रदर्शन सुनीता पानघंटीवार यांनी केली.

कार्यक्रमात महिलांचा स्नेहमिलन घेऊन सर्वांचा परिचय देण्यात आला, तसेच महिला बचत गट याविषयी माहिती, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जिवनावर आधारित पुस्तक देण्यात आली. कार्यक्रमाला नम्रता कूचेवार, चंदा पुरमशेट्टीवार , सीमाताई ताटेवार, विशाखा बाचिकवार, संगीता पुरमशेट्टीवार, वैशाली मंथनवार, अर्चना लवंगेवार, विना कोंडमवार, कल्याणी पेरमवार, मंगला पेरमवार, सीमा सुगरवार, रंजना सुगरवार, विना मसेवार, शालिनी मूत्यलवार, वंदना मूत्यलवार, मेघा मसेवार , नंदा मसेवार, सिमा दासरवार, मनीषा मारगमवार , वैशाली मारगमवार, शोभा जूब्बेवार, मंजूताई सिध्दमशेट्टीवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेलदार समाज बहुउद्देशीय संस्थेचे ज्ञानेश्वर बोनगिरवार, गजानन चंदावार, संदीप मूत्यलवार आदींनी सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share