WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्री छत्रपती महोत्सवाचे आयोजन...... विविध कार्यक्रमांची मेजवानी :-

Image

मोठ्या प्रमाणात जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन.....

सुरज चाटे वणी :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि छत्रपती राजाराम महाराज जयंती , या ऐतीहासीक दिनाचे औचित्याने छत्रपती महोत्सवाचे आयोजन जगात सर्वत्र उत्साहाने होत आहेत . याच आयोजनाचा एक भाग म्हणुन वणी परिसरात दिनांक 19 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान विथी, वैचारीक आणि प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे शिवाजी महाराज हे गौरव ठरले आहे , हजारो वर्ष असलेल्या गुलामीतुन त्यांनी सामान्य माणसाला मुक्त केलं . शिवजयंती उत्सवाच्या सोबतच राजाराम महाराज यांची दैदिप्यमान कारकिर्द आणि कर्मयोगी गाडगेबाबांचा प्रबोधनाचा वारसा, समाजात प्रसारीत व्हावा या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन केले आहे .

श्री छत्रपती महोत्सवाचा उद्घाटन सोहळा दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शिवतीर्थावर आरंभ होईल, तत्पुर्वी दुपारी २ वाजता जिजाउ चौक ते शिवतिर्थ अशी मोटारसाईकल, कार रॅली निघेल . सायंकाळी या महोत्सवाचे उद्घाटना सोबतच जाहिर व्याख्यान, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे संघटक डॉ . बालाजी जाधव , औरंगाबाद हे जाहीर सभेस संबोधित करतील , महोत्सवाचे उद्घाटन आमदार बाळूभाऊ धानोरकर करतील तर अध्यक्ष स्थानी कुणबी समाज संस्थेचे सचिव नामदेवराव जेनेकर असतील , तर संभाजी ब्रिगेडचे जिलाध्यक्ष अजय धोबे हे स्वागताध्यक्ष असे विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख अतिथी राहणार असून बुधवार दिनांक 20 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजता भालर येथे तर दिनांक 21 , 02 , 2018 रोजी निवली येथे विकास चिळे गुरुजी यांची विकासवाणी संपन्न होईल , दिनांक 22 . 02 . 2018 ला मोहदा येथे प्रा . दिलीप चौधरी यांचे व्याख्यान होईल, दिनांक 23 . 02 . 20 1 9 रोजी कर्मयोगी गाडगेबाबा जयंती निमीत्य गुरुकुंज आश्रम मोझरी चे संचालक श्री . रविदादा मानव यांचे व्याख्यान आणि तुषार पोहीनकर व आकाश तायडे , मोझरी हया दोन बाल किर्तनकारांचे किर्तन ग्रा . पं . कार्यालय गणेशपुर येथे संपन्न होईल . छत्रपती राजाराम महाराज जयंती निमीत्य दिनांक 24 . 02 . 2019 रोज रविवार ला श्री रावीदादा मानव यांचे व्याख्यान आणि तुषार पोहीनकर व आकाश तावडे , मोझरी हया दोन बाल किर्तनकाराचे किर्तन जि . प . शाळा चिखलगाव येथे सायंकाळी 7 वाजता संपन्न होईल तर दिनांक 25 . 02 . 2019 रोज सोमवारला सायंकाळी 7 वाजता नायगांथ ( बु . ) येथे संपन्न होईल . हया संपुर्ण छत्रपती महोत्सवाचा समारोप सोहळा दिनांक 26 . 02 . 2019 रोज मंगळवारला सायंकाळी 7 वाजता नांदेपेरा येथे होईल याप्रसंगी रावीदादा मानव प्रबोधन करतील व तुषार पोहीनकर तथा आकाश तायडे , मोझरी हया दोन किर्तनकारांचे किर्तन संपन्न होईल . पं . स . सदस्या चंदज्योती शेंडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील तर वेगवेगळया क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत असतील . हा छत्रपती महोत्सव सोहळा समाजातील विषमता , दारीद्वय आणि धार्मीक कट्टरतेची दरी मिटविण्यास हातभार लावेल .

या भावनेने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असुन समाजातील सर्व स्तरातील लोकांनी हयात उत्साहाने सहभाग घ्यावा असे आवाहन संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ , जिजाउ ब्रिगेड यांच्या वतीने अजय धोबे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड , तालुकाध्यक्ष विवेक ठाकरे , अॅड . अमोल टोंगे , अॅड . शेखर व - हाटे , कपील रिंगोले , दत्ता डोहे, मोहन हरड़े, रुशीकांत पेचे , मारोती जिवतोडे तसेच भारती राजपुत , मायालाई आसुटकर , सुरेखाताई हरडे , विजयाताई ठाकरे यांनी दिनांक 16 ला शासकीय विश्राम गृह वणी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले असून मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवावी असे सुद्धा कळविण्यात आले आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share