WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भीषण अपघातात ३ ठार,

Image

वरोरा चंद्रपूर मुख्य मार्ग :-

भरधाव ट्रकने तिघांस चिरडले....

सुरज चाटे वणी :- चंद्रपूर नागपूर महामार्ग सारखा वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो दिनांक १६ फेब्रुवारी ला सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आनंदवन चौकातील चौफुली वर नागपूर वरून येणाऱ्या भरधाव ट्रॅकने दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकी स्वार, त्याची पत्नी व मुलगी यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चंद्रपूर नागपूर हा महामार्ग अतिशय व्यस्त महामार्ग असून शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान बोर्डा येथील ईश्वर भास्कर मिलमीले ( वय ४५), पत्नी अलका ईश्वर मिलमिले ( वय ३४) व मुलगी समृद्धी मिलमिले ( वय ७) हे प्रकृती डॉक्टरांकडे दाखवण्याकरिता आपल्या दुचाकीने वरोऱ्याच्या दिशेने जात असताना अचानक मागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार व त्याचे दुचाकीवरील सहकारी खाली पडल्याने ट्रकच्या समोरचा चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अल्का व समृद्धी हिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी स्वार ईश्वर हा गंभीर असल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा सुद्धा मृत्यू झाला असून या अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share