WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुतार समाजाचे संघटना शताब्दी महोत्सव आणि पाहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन

Image

सुरज चाटे :- ब्रिटिश कालीनकालीन विदर्भ प्रांतातील सुतार समाजाचा एकसंच करून संघटनात्मक समाजशक्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने दिनांक १९ ऑक्टोबर १९१७ रोजी १०१ वर्षे झाले.या निमित्ताने विद्यमान महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार ( झाडे ) समाज महासंघाद्वारे विश्वकर्मीय सुतार झाडे समाज शताब्दी महोत्सव सोहळा आणि सुतार समाजाचे पाहिले राज्यस्तरीय अधिवेशन तसेच नागरी सत्कार रविवार दिनांक ३ मार्च २०१९ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे आयोजित केला आहे.

या सोहळा व नागरी सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. रमेशराव वनकर, उद्योजक तथा माजी अध्यक्ष माहाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार झाडे समाज, मा.श्री. देवेंद्र दहिकर, नायब तहसिलदार , उप विभागीय कार्यालय, गडचिरोली,सत्कारमूर्ती विश्वकर्मीय सुतार समाजाचे जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री, पद्मभूषण सन्मानित,आदरणीय श्री. राम सुतार नवी दिल्ली, प्रमुख अतिथी मा.श्री.पी.जी .सुतार भाऊसाहेब,दानशूर उद्योजक,धुळे. विशेष अतिथी,मा.नामदार श्री हंसराजजी अहिर, केंद्रीय गृह राज्य मंत्री भारत सरकार,मा.नामदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार वित्त, नियोजन व वन मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.आमदार श्री नानाभाऊ शामकुळे,चंद्रपूर विधान सभा क्षेत्र, मा.आमदार श्री. संजयजी रायमूलकर मेहकर विधानसभा क्षेत्र, मा.श्री. मनोहर पाऊनकर अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर, मा.श्री. किशोर जोरगेवर नेते चंद्रपूर विधानसभा चंद्रपूर. उपस्थित राहणार असून या मान्यवरांचे शुभ हस्ते विश्वकर्मीय सुतार समाजाचे जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री, पद्मभूषण सन्मानित आदरणीय श्री.राम सुतार नवी दिल्ली यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच सुतार समाजातील प्रतिभावंतना सुद्धा गौरविण्यात येत आहे.

सोबतच समाजाच्या निगडित वर्तमान परिस्थितिथी या विषयाबाबत १)सुतार समाज एकत्रीकरण काळाची गरज या विषयावर मा.ह . भ. प.श्री.संदीप दिक्षित महाराज उद्योजक ,कोरेगाव सातारा, मा. श्री.विद्यानंदजी मानकर, रजिस्ट्रार अजिंक्य डी.वाय .पाटील टेक्निकल कॅम्पस पुणे, २) सुतार समाज आणि राजकीय अस्तित्व या विषयावर मा.प्रा .डॉ . ज्योती ताई राखुंडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर, मा.श्री. भारतजी जाधव भाषा अनुवादक भाषा संचनालय मराठी भाषा विभाग मंत्रालय मुंबई, ३) सुतार समाज आणि रोजगार संधी व आव्हाने या विषयावर मा.प्रा .विजयजी रायमल देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा, मा.श्री .गजाननराव देऊळकर उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नागपूर या समाजातील वक्त्यांचे चर्चा सत्रात मार्गदर्शन लाभणार आहे.या चर्चा सत्र व अधिवेशनात जास्तीत जास्त सुतार समाज बंधू भगिनींनी उपस्थित राहावे. अशी विनंती मा.श्री. प्रदीप जानवे अध्यक्ष महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे )समाज महासंघ यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share