WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एकांकीका पाहून वणीकर भारावले... युवक व महिलांनि विविध स्पर्धा गाजविल्या......

Image

सुरज चाटे वणी:- अखिल भारतीय सांस्कृतिक मंच तर्फे वणी शहरात प्रथमच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकर चौक येथील कल्याण मंडपम येथे स्पर्धा घेण्यात आली. नाट्य, नृत्य तसेच युवकांसाठी जल्लोश युवांचा आणि महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

क्राफ्ट स्पर्धमध्ये शिवाणी धानोरकर प्रथम , अर्पित मोहुर्ले द्वितीय तर रांगोळी स्पर्धेमध्ये रविना अर्पित मोहुर्ले अाणि रुची दुडके प्रथम अाले . यानंतर पेटिंग स्पर्धेमध्ये रविना खेडेकर प्रथम , अोम मडावी आणि शिवाणी धानोरकर द्वितीय अाले. गितगायन श्रवण चुंबळे हा प्रथम आला. समूह नृत्य स्पर्धेमध्ये प्रेमा ग्रुप प्रथम तर एकल नृत्या मध्ये आरोही देशपांडे आणि अबुबकरमिद्दा प्रथम आले आणि वादन मध्ये सुमित ईंगळे हा प्रथम आला. महीलांसाठी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेमध्ये मंजुषा लोथे आणि स्नेहलता चुंबळे यांनी पारितोषिक प्राप्त केले.

वणीत प्रथमच एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. सागरझेप बहुउद्देशीय संस्थे अंतर्गत 'ऑपरेशन दगड' या एकांकिकेला प्रथम पारितोषिक प्राप्त केले. सागर मुने यांनी दिग्दर्शन केले असून ऑपरेशन दगड मध्ये संदीप उरकुडे, मंगेश गोहोकार, आकाश महाडुळे, शुभम उगले, पल्लवी मसराम , सुप्रिया केदार, रुपाली सालकाडे, चारू नरुले यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या, या एकांकिके मध्ये सामाजिक विषय व गावातील परिस्थिती दाखवण्यात आली आहे.

याकार्यक्रमाला अध्यक्ष स्थानीक ब्राहमण सभेचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर तसेच प्रमुख पाहुणे राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर , गणेश धानोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाठक यांनी केले. संचालन श्रीवर्धन लोथे व आभार पायल परांडे हिने केले. ओम मडावी ,दीक्षांत भगत,दीपक मालेकर,आरोही देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share