WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आगामी निवडणुकीवर बहिष्काराचा एल्गार

Image

  • कान्हाळगाव येथील ग्रामस्थांचा इशारा
  • जिल्ह्याधिकारीसह तहसीलदारास निवेदन

  • दीपक डोहणे :- मारेगाव तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या कान्हाळगाव (वाई) येथील गावात मूलभूत गरजेचा अभाव असून मागील तीस वर्षांपासून गावाचा विकास कोसो दूर असल्याने राजकीय पुढारी तथा लोकप्रतिनिधींच्या वल्गना केवळ पोकळ ठरल्याने मूलभूत गरजा पूर्ण होणार नाही. तोपर्यंत निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

    कान्हाळगाव येजा करण्यास रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. त्यामुळे पायी चालणे दुरापास्त होत आहे. अशातच रुग्ण अथवा शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान सदर गाव हे पेसा अंतर्गत मोडत असताना विकास निधीही प्राप्त न झाल्याने येथील विकास कायमचा खुंटला आहे. येथील रस्त्या सह वीज पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना लोकप्रतिनिधी केवळ भूलथापा देऊन नागरिकांची बोळवण करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून गावाचा विकास अथवा रस्त्याचे कामे पूर्णत्वास जाणार नसल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एल्गार येथील नागरिकांनी पुकारला आहे तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी तथा तहसील प्रशासनास देण्यात आले आहे.

    वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



    share