WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

Image

  • मारेगाव शहरातील घटना
  • मृत्यूपूर्वी चिट्ठीत नाहक त्रास देत असल्याचा आरोप

  • दीपक डोहणे मारेगाव :- मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील विवाहितेने स्वतःचे घरात गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवारला सकाळी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या महिलेने मृत्यूपूर्व चिट्ठीत येथील प्रभागातील एका कुटुंबियांकडून नाहक त्रास असह्य होत असल्यानेच आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याने हे आत्महत्या प्रकरण नेमके कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Image

    Helpline - 9730292827

    शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील सोनू हिरालाल जाट (३०) हि महिला मोल मजुरी करून आपल्या दोन कोवळ्या मुलीसह वास्तव्यात होती. पती गेल्या चार वर्षांपासून मध्यप्रदेश राज्यात असल्याने आईवडिलांच्या घरासमोर सोनू हि आपल्या दोन अपत्यांचा सांभाळ करून गुजरान करीत असे. परिणामी गुरुवारला सकाळी मुली झोपेतून उठताच हि दुर्दैवी बाब उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

    दरम्यान आत्महत्या पूर्व चिठ्ठीत याच प्रभागातील एक कुटुंब नाहक मानसिक व आर्थिक त्रास देत असल्यानेच मी जीवन संपवीत असल्याचा उल्लेख नमूद असल्याने हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



    share