WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मंडळ अधिकारी तसेच तलाठ्याला लाच घेताना अटक

Image

सुरज चाटे वणी :- यवतमाळ जिल्हा आधीच दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करण्यात आला असून, फेरफार व सातबाऱ्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून लाच घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. वरध येथील शेतकऱ्याला संयुक्त कुटुंबाच्या नावाने असलेल्या सातबाऱ्यावरून मयताचे नाव कमी करण्यासाठी आरोपी राजेश ताकसांडे तलाठी वरध, संजीव रोहणकर मंडळ अधिकारी वरध यांनी सात हजार रुपयाची लाच मागितली. यानंतर एसीबी पथकाने बुधवारी सापळा रचून दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन राळेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share