WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आरमोरी येथील तहसीलदाराला लाच घेताना अटक

Image

वीटभट्टीच्या परवान्यासाठी एका व्यावसायिकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना आरमोरी येथील तहसीलदार यशवंत धाइत याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक १२ फेब्रुवारी रोजी अटक केली. आरमोरी येथील व्यावसायिकांने परवण्या साठी अर्ज करून चलन भरला होता. मात्र त्याला अनेक दिवस मंजुरी मिळाली नाही. संबंधित व्यावसायिकाने तहसीलदारची भेट घेतली असता त्यांनी ५००० रुपयाची मागणी केली. याबद्दल व्यवसायीकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून तहसीलदारास अटक केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share