WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आढळले आज कोरोनाचे सात रुग्ण

Image

corona update २८ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात प्रतिदिन कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हजारी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६२ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ वर आली आहे. आज आणखी ११ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८७८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

कोरोना संक्रमणाची गती मंदावली असली तरी प्रतिदिन कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. आज आठ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ४ पॉझिटिव्ह तर चार अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ५२ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून तीन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर ४९ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १२ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५५ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. ६१ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ७ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर २२ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये आनंदनगर येथील एक, रवीनगर एक, टागोर चौक एक, आंबेडकर चौक येथील तीन तर भालर कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाची रुग्णवाढ रोखण्याकरिता हरसंभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले