WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिरगिरी पोड (पेटूर) येथील तरुणी मागील चार दिवसांपासून घरून बेपत्ता

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यातील शिरगिरी पोड (पेटूर) येथील तरुणी मागील चार दिवसांपासून बेपत्ता असून तिला गावातीलच तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलाने व्यक्त केला असून तशी रीतसर तक्रार वडिलांनी वणी पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

शिरगिरी पोड (पेटूर) येथील तरुणी १८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता प्रातःविधीला गेली ती घरी परतलीच नाही. खूप वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोधाशोध घेतला असता ती कुठेच आढळून न आल्याने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत संशयिता विरुद्ध तक्रार नोंदविली. मुलगी बेपत्ता झाल्यापासून त्याच गावातील एक तरुणही गावात आढळून न आल्याने मुलगी घरून पळून गेल्याचा वडिलांचा संशय आणखीच गडद झाला आहे. गाव खेड्यातील शाळा कॉलेजांमध्ये शिकणाऱ्या मुलींचा पिच्छा पुरवून त्यांना विविध प्रलोभने देऊन प्रेम पाशात अडकवून त्यांना फूस लावून पळविण्याचा घटना वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलींच्या सुरक्षितेचे प्रश्न निर्माण झाल्याने पालकवर्ग चांगलाच काळजीत आला आहे. सदर मुलगी चार दिवसांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला असून मुलीचे शोधकार्य सुरु केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.