WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Image

corona update २१ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२९ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. आज आणखी पाच रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८३० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

तालुक्यातील ३६ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झाले असून ४ पॉझिटिव्ह तर ३२ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १२१ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून तीन पॉझिटिव्ह तर ११८ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ६८ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ९७ अहवाल प्रलंबित आहेत. आता पर्यंत एकूण ६८४३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात आज सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२९ झाली असून ८३० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, २२ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर २१ रुग्ण यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये जैन ले-आऊट, लक्ष्मीनगर, आनंदनगर, विद्यानगरी, रामपुरा, भालर कॉलनी, कोना येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच प्रत्येकाने कोरोना विषयक नियमाचे पालन करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले