WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Image

corona update ९ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात आज तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२१ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. आज आणखी एक रुग्ण कोरोनातून बारा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ७७० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आली असून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवरही अंकुश लागला आहे. आज पॉझिटिव्ह आलेले तीनही रुग्ण रॅपिड अँटीजेन चाचणीतून आले आहेत. तपासणी नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले नसून आज आणखी ३० व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १३० रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. आज तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२१ झाली असून ७७० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ११ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर १० रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये पळसोनी येथील एक तर शहरातील दोन व्यक्तींचा समावेश आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.