WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विषारीद्रव्य प्रश्न करून मायलेकांनी घेतला जगाचा निरोप

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील मायलेकांनी विषारीद्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ८ ऑक्टोबरला उघडकीस आली. ७ नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास घरून बेपत्ता असलेल्या मायलेकांचा आज ८ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास कळमना रोडवरील कातकडे यांच्या शेताजवळील नाल्याजवळ मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

शहराला लागूनच असलेल्या चिखलगांव येथील मायलेकांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मायलेकांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. राहुल दुर्वास निखाडे (२४) व संगीता दुर्वास निखाडे (४५) अशी या जीवनमुक्त झालेल्या मायलेकांची नावे आहेत. राहुल निखाडे हा अविवाहित असून तो शेतात सालगडी म्हणून काम करायचा तर त्याची आई शेत मजुरीचे काम करायची. मुलीचे लग्न जुळले असताना आई व भावाने केलेली आत्महत्या आनंदावर दुःखाचे पांघरून ओढणारी ठरली आहे. आव्हाने न पेलल्याने मनाचे खचीकरण होऊन जीवन संपविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सतत होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका चांगलाच हादरला आहे. तालुक्यातील नागरिक दिवाळी साजरी करण्याच्या तयारीला लागले असताना या मायलेकांनी मरणाला जवळ केल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मोलमजुरी करून सुखसमाधानाचं जीवन जगत असतांना या मायलेकांनी आत्महत्येसारखा पर्याय का बरं निवडला ही एकच चर्चा गावात सुरु आहे. त्यांच्या या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले