WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Image

corona update ८ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात आज कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८१८ वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ झाली आहे. आज आणखी १० रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ७६९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

तालुक्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्याही नियंत्रणात आली आहे. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण रॅपिड अँटीजेन चाचणीतून आले आहेत. आज १३ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ११ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज एकही तपासणी अहवाल प्राप्त झाला नसून आणखी नऊ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ९० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. आज दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१८ झाली असून ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ११ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर १० रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये भालर येथील एक तर लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या मागील एका व्यक्तीचा समावेश आहे. तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्याकरिता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.