WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आढळले आज करोनाचे नऊ रुग्ण

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यात आज प्रतिदीन आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांत काहीशी वाढ झाली असून आज तालुक्यात 9 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामूळे तालुक्यातील एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढून 773 झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 21 झाली आहे. आज आणखी 6 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्याना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत 749 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

तालुक्यात आज पॉझिटीव्ह आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून आज 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज 40 तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 8 पॉझिटीव्ह तर 32 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज 12 व्यक्तींची रॉपिड़ अँटीजन चाचणी करण्यात आली असून एक पॉझिटीव्ह तर 11 व्यक्तींच्या रेपोर्ट निगेटीव्ह आल्या आहेत. आज आणखी 28 व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने 40 नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. आता पर्यंत एकुण 5704 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात आज 9 व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याने एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 773 झाली असून 749 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 21 झाली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 12 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, 3 रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर 6 व्यक्ती यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत.

आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींमधे उकणी येथील एक, चिखलगाव एक, लालगुडा एक, रंगारीपुरा एक, प्रगती नगर एक, गाडगेबाबा चौक दोन, सेवानगर येथील एक तर रवी नगर येथील एका व्यक्तिचा समावेश आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.