WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विवाहितेवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपिस अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील मोक्षधाम परिसरात वास्तव्यास असलेल्या तेवीस वर्षीय विवाहितेवर त्याच परिसरातील 20 वर्षीय तरुनाने अतिप्रसंग केल्याची घटना 27 ऑक्टोंबरला घडली. महिलेने अत्याचार झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविल्या नंतर सदर प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी अतिप्रसंग केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला अटक करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार मोक्षधाम परिसरात राहणारी 23 वर्षीय महिला नेहमी प्रमाणे आरोपीच्या घरी पाणी भरण्यासाठी गेली असता आरोपीने घरी कुणी नसल्याची संधी साधत सदर महिलेला घरात ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी केल्याची तक्रार सदर महिलेने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. महिलेच्या तक्रारी वरुन पोलिसांनी चेतन भटवळकर (20) रा. मोक्षधाम जवळ, सेवानगर यास अटक करुन त्याच्यावर भादंवि च्या कलम 376,354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पिडीत महिलेला वैद्यकीय तपासणी करिता यवतमाळ शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आरोपी हा भजिपाल्याचा व्यवसाय करित असून दुपारला तो आंघोळ व जेवन करण्याकरिता घरी येत असल्याचे समजते. दरम्यान महिला पाणी भरण्याकरीता गेली असता त्याने संधी साधून अतिप्रसंग केल्याचा आरोप आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले