WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

काचेने मानेवर वार करून इसमाला केले जख्मी

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

जुन्या वादातून दोघा जणांनी एकाच्या मानेवर काचेने वार केल्याची घटना शहरातील दीपक चौपाटी परिसरातील करण बार समोर २२ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास घडली. रवी रामराव गाढवे (४१) रा. रामपुरा वार्ड असे या जख्मी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे.

दीपक चौपाटी येथे गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले असून अपप्रवृतीच्या लोकांचा दीपक टॉकीज परिसर मुख्य अड्डा बनला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून येथील गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. शहरातील संपूर्ण बाजारपेठेबरोबरच मंदिरालयांचीही वेळ वाढविण्यात आल्याने दीपक चौपाटी परिसरात रात्रीच्या वेळेला मद्य शौकिनांचा धिंगाणा सुरु असतो. मद्याच्या झिंगात वादावादी होऊन हाणामारीची प्रकरणे घडत आहे. जुन्या वैमनस्यातून दोघा जणांनी एकावर तीक्ष्ण काचेने हल्ला चढविला. काचेच्या तुकड्याने मानेवर वार करून जख्मी केले. काही दिवसांआधी साळ्याला मारहाण केल्याचा वचपा काढण्याकरिता दोघा जणांनी रवी गाढवे याच्या मानेवर तीक्ष्ण काचेने वार करून जख्मी केले. शहरातील दीपक चौपाटी परिसरातील करण बार समोर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रवी गाढवे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ईश्वर दशरथ देठे (२८) व राम दशरथ देठे (३२) दोघेही रा. रंगनाथ नगर याना अटक करून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३२४,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले