WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शुल्लक कारणावरून दगडाने मारहाण

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

दुचाकीला वेल्डिंग करण्याच्या शुल्लक कारणावरून वेल्डिंग दुकानदारासोबत वाद घालीत त्याला दगडाने मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना २२ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास वाटर सप्लाय समोर घडली. शिवशक्ती बलराम चव्हाण (३७) रा. वाटर सप्लाय जवळ, या वेल्डिंग दुकानदाराला गजानन होमदेव कनाके (२९) रा. वाटर सप्लाय समोर, याने वेल्डिंग करण्याचा तगादा लावत दगडाने मारहाण केली.

शहरातील वाटर सप्लाय समोर शिवशक्ती चव्हाण याचे वेल्डिंगचे दुकान आहे. आरोपी गजानन कनाके हा दुचाकीला वेल्डिंग करण्याकरिता त्याच्या दुकानात गेला. शिवशक्ती याने त्याला थोडावेळ थांबण्यास सांगितले असता तो आरडा ओरडा करीत त्याच्या अंगावर धावून गेला व त्याला दगडाने मारहाण केली. शिवशक्ती याने पोलीस स्टेशला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गजानन कनाके याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३२४,५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.