WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील आज चार व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह

Image

corona update १४ oct

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोना रुग्णांची संख्याही मंदावली आहे. आज चार व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८६ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ झाली आहे. आज आणखी चार रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६५८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

आज ४४ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ४ पॉझिटिव्ह तर ४० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज करण्यात आलेल्या १५ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १५ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ४४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. आज चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ६८६ झाली असून ६५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ वर आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, सहा रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात तर चार रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेले चारही व्यक्ती चिखलगांव येथील रहिवासी आहेत. प्रशासन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याकडे वाटचाल करीत असून नागरिकांनीही प्रशासनाला योग्य सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले