WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आढळले आज कोरोनाचे पाच रुग्ण

Image

corona update १२ oct

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाचा वाढता आलेख कमी झाल्याने कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाणही कमी झाले आहे. आज पाच व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८० झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ झाली आहे.

तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर रोख लागली असून कोरोनाग्रस्त रुग्ण कमी प्रमाणात आढळत असल्याने नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. आज १२ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून एक पॉझिटिव्ह तर ११ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या २७ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये ४ पॉझिटिव्ह तर २३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या. आता पर्यंत २२१७ रॅपिड अँटीजेन चाचण्या तर २६२६ आरटी पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी २१ व्यक्तींचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आल्याने ५८ स्वाबचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. तालुक्यात आज ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ६८० झाले असून ६५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची ५ रुग्ण कोविड केयर सेंटरला, ५ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात तर १८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये मंदर येथील एक, चिखलगांव एक, तर शहरातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाची रोखथाम करण्याकरिता निरनिराळ्या उपाययोजना आखत असून नागरिकांनीही खबरदारीचे नियम पाळण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले