WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्ष पदी राकेश सवंत्सरे याची नियुक्ती

Image

*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*

नॅशनल सोशालिस्ट पार्टीशी संलग्न असलेल्या माहिती अधिकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्ष पदावर युवा समाजसेवक राकेश चंद्रकांत सवंत्सरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष अभिजित आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली व समितीचे राज्य अध्यक्ष दिपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे, विभागीय मार्गदर्शक प्रकाश भारती, राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अजय कंडेवार यांनी सुचविलेल्या प्रमाणे राकेश सवंत्सरे यांची समितीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती पत्रकारांवर होणारे हल्ले, फोफावले अवैध धंदे, वेगवेगळ्या क्षेत्रात वाढत चाललेला भ्रस्टाचार तसेच गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अत्याचार निर्मूलनासाठी महाराष्ट्रभर कार्य करते. त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष अभिजित आपटे यांच्या मार्गदर्शनात समितीचे सर्व पदाधिकारी समाजाच्या हितासाठी, भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी, सामाजिक नाय हक्क व संरक्षणासाठी, प्रशासकीय बेजबाबदारपणावर वचक ठेवण्यासाठी तसेच अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी संपूर्ण देशभरात तत्परतेने कार्य करतात.

अशा या पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्ष पदी राकेश सवंत्सरे यांची निवड झाल्याने त्यांच्यावर मित्र परिवार व आप्त परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.