WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनाने घेतला आणखी एक बळी, प्रसिद्ध कायद्याचे जाणकार हरपले !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोना या महामारीने आणखी एक बळी घेतला असून यवतमाळ येथे उपचार सुरु असलेल्या एक नामांकित कायद्याच्या जाणकाराचा मृत्यू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले होते. आयसोलेशन मधील अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आले होते. मागील सात आठ दिवसांपासून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते. तसेच त्यांना शुगर व बीपीचा त्रास असल्याचेही समजते. त्यांच्या जाण्याने शहरातील कायदे क्षेत्रातील जाणकार हरपला असल्याने शहरात शोककळा पसरली आहे. कोरोनाने मृत्यू झाल्याचे ते तालुक्यातील सातवे व्यक्ती ठरले आहेत. पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविल्याचे कळते. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने जनता भयभीत झाली असून या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहे. काही दिवसांच्या अंतरातच तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रंगारीपुरा येथील ६० वर्षीय व्यक्ती, सोमनाळा येथील ६५ वर्षीय व्यक्ती तर आज प्रसिद्ध कायद्याचे जाणकार कोरोनाने दगावल्याने कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे जाणवू लागले आहे. त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यात नोंद झालेले ते तालुक्यातील पाचवे कोरोनाबाधित व्यक्ती ठरले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले