WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अभिनेत्री कंगना रानौत हिच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तसेच मुंबईची तुलना पाकव्याप्त कारश्मीरशी करणाऱ्या कंगना रानौत या अभिनेत्रीवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठत असतांनाच आज ४ सप्टेंबरला शिवसेना वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने शिवाजी चौक येथे कंगना रानौत हिचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात अभिनेत्री कंगना रानौत हिच्या प्रतिमेला काळिमा फासून तिच्या तैलचित्राची होळी करण्यात आली.

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री कंगना रानौत हि मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रा विषयी अभद्र व वाचाळ वक्तव्य करीत असून महाराष्ट्र पोलीस व मुंबई विषयी आक्षेपार्ह टिपण्या करीत आहे. मुंबई ही कंगना रानौतची कर्मभूमी असून मुंबई बद्दल कृतज्ञता बाळगण्या ऐवजी मुंबई बद्दल मानसिक संतुलन हरपल्यागत वाट्टेल ते बरळत सुटलेल्या कंगना रानौतवर देशद्रोहाची कार्यवाही करण्याचे नारेही यावेळी शिवसैनिकांनी दिले. महाराष्ट्रात कमवायचं, इथलंच खायचं, महाराष्ट्र पोलिसांकडूनच संरक्षण मिळवून घ्यायचं व महाराष्ट्र पोलिसांविषयीच आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांच्यावरच आरोप करायचे, हे खपवून घेतले जाणार नसल्याचेही यावेळी शिवसैनिकांनी एका स्वरात जाहीर करतांनाच तिला मुंबईत राहणे सुरक्षित वाटत नसेल तर तिने खुशाल मुंबई सोडून जावे. तसेही असे बिनबुडाचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचेही शिवसैनिकांनी आपल्या घोषणेतून जाहीर केले. यावेळी घेण्यात आलेल्या निषेध सभेत शिवसेनेचे तालुका प्रमुख रवी बोढेकर, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रम चचडा, महेश चौधरी, प्रशांत बल्की, अमोल बोरूले, अजय चन्ने, बंटी येरणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले