WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विनायकनगर मधील नगर पालिकेची पाईप लाईन फुटल्याने पाणी रस्त्यावरून वाहात आहे

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील विनायक नगर मधील नगर परिषदेची पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फुटली असून त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने काल पासून पाण्याचा अपवेय होत असून याठिकाणी तळे साचल्याने दुकानदारांना दुकानदाऱ्या बंद कराव्या लागल्या आहे. विनायक नगरातील डॉ. हेडाऊ यांच्या दवाखान्या समोरील नगरपरिषदेची पाण्याची पाईप लाईन फुटल्याने काल पासून पाण्याचे लोट वाहतांना दिसत आहे. नगर पालिकेच्या जल विभागाचा कोणताही जागृत कर्मचारी याकडे लक्ष देत नसून नागरसेवकाच्याही ही बाब लक्षात न आल्याने काल पासून फुटलेल्या पाईप लाईन मधून पाणी रस्त्यांवरून वाहतांना दिसत आहे. फुटलेल्या पाईप लाईन मधून सारखे पाणी वाहत असल्याने पाण्याचा अपवेय होत असून पाण्याचे तळे साचल्याने दुकानदारांना दुकाने बंद करावी लागली आहे. नगर पालिकेने याकडे लक्ष देऊन पाईप लाईन दुरुस्त करण्याची मागणी विनायक नगर वासियांकडून करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.