WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुरधोनी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील मुरधोनी येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली आहे. संजय भाऊराव पारखी (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने राहत्या घरातील आड्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव शरीर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मृतकाचा मावसभाऊ पंढरीनाथ वामन आवारी (४७) याने पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले