WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिवंत विद्युत तार तुटून पडल्याने दुचाकी जळून खाक

ImageImage

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील बोर्डा गावात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी वाहनावर जिवंत विद्युत तर तुटून पडल्याने दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे. मोहन विठ्ठल दुमोरे यांच्या मालकीची ही दुचाकी असून वेगाव रोडवर असलेल्या आपल्या शेतामध्ये ते गेले असता रोडच्या कडेला उभी असलेल्या त्यांच्या दुचाकीवर अचानक जिवंत विद्युत तार तुटून पडल्याने दुचाकीने पेट घेतला व क्षणार्धात ती पूर्णतः जाळून खाक झाली. यात कोणालाही शारीरिक इजा झाली नसली तरी दुकाचाकी जळाल्याने सदर शेतकऱ्याचे अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटात बिकट परिस्थितीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यावर अशाप्रकारचे अनाहक संकट कोसळल्याने सदर शेतकरी चांगलाच खचला असून आर्थिक तंगी भोगत असतांना अशाप्रकारची वित्त हानी झाल्याने सदर शेतकरी चिंतातुर झाला आहे. वीज पोलावरील जिवंत तर तुटून दुचाकीवर पडल्याने दुचाकी जळून खाक झाली असून याला एक प्रासंगिक अपघात समजून प्रशासनाने सदर शेतकऱ्याला आर्थिक भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले