WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन चे दहावीच्या परीक्षेत देदिप्यमान सुयश ११ विद्यार्थी झळकले गुणवत्ता यादीत

ImageImage

चांदणी खरवडे ९४.८०% टक्के गुण प्राप्त करून शाळेतुन तसेच झरी तालुक्यात प्रथम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने दहावीचा बोर्डाचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत मुकुटबनयेथील गुरुकुल कॉन्व्हेंट ची कु. चांदणी खरवडे हिने ९४.८०% टक्के गुण मिळवून प्रथम कमांक प्राप्त केला तर साक्षी मुसळे आणि खुशी मेश्राम यांनी अनुक्रमे ९४.६०% टक्के गुण मिळवुन द्वितीय कमांक प्राप्त केला तसेच खुशी येमुलवार हीने ९४. ४० % टक्के गुण मिळवून तृतीय कमांक पटकाविला आहे. कुंमकुंम मत्ते हिने ९३.८० % गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळविला आहे तसेच आकांशा टोंगे हिने ९३.६०% गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक पटकावला.विशाल तुडमवार, केतन वडके यांनी अनुक्रमे ९३.२०% मिळवून सहावा क्रमांक मिळविला आहे. समीर गावंडे याने ९२.००% दीक्षा पारखी ९१.४०% साहिल दुरुतकर ९०.२०% सत्कार चिंतावर व अक्षय बादलवार यानी ८९.८०% गुण मिळवले.विशेष बाब अशी की या शाळेचे ११ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत पास झाले तर ७ विदयार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत पास झाले तसेच इतर विदयार्थ्यांनी सुध्दा गुणवत्ता यादीत आपले स्थान प्राप्त केले. शाळेचा एकूण निकाल १००% टक्के लागलेला आहे.

विदयार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबदद्ल शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ,संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. सुभाष गजभिये सर सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.