WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Breaking | झरी जामणी तालुक्यात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

Image

यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात बुधवारी एका कारोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या 27 झाली आहे. तर आज नव्याने 46 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 26 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज (दि. 29) मृत झालेल्यामध्ये उमरखेड तालुक्यातील खरूज येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 46 जणांमध्ये 30 पुरुष व 16 महिला आहे. यात दिग्रस शहरातील 13 पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील संभाजी नगर येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील 10 पुरुष व आठ महिला, झरी जामणी शहरातील तीन पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष व दोन महिला, दारव्हा येथील अंबिका नगर येथील एक महिला आणि नेर शहरातील दोन पुरुष यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात दि. 28 पर्यंत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 324 होती. यात आज 47 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 371 वर पोहचला. मात्र एका जणाचा मृत्यु व ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 26 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 344 आहे.

यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 310 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 34 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 899 झाली आहे. यापैकी 528 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 27 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 100 नमुने तपासणीकरीता पाठविले. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 15196 नमुने पाठविले असून यापैकी 12874 प्राप्त तर 2322 अप्राप्त आहेत. तसेच 11975 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले