WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरातील आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली एकोणवीस!

Image

प्रशांत चंदनखडे वणी :-

शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून आज आणखी एका वृध्द व्यक्तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या 19 झाली आहे. प्रतिबंधक क्षेत्र सहा येथे सदर इसम वास्तव्यास असल्याचे समजते. त्याच्या सम्पर्कातील 21 व्यक्तीना कोविड सेंटर मध्ये हलविण्यात आले असून पॉझिटीव्ह व्यक्तीला पुढील उपचारा करिता यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे. एकामागून एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळत असल्याने शहरात कोरोनचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. पॉझिटीव्ह व्यक्ती रहात असलेला तेली फैलातिल काही भाग सील करण्यात आला असून 27 व्यक्तीना होम क्वरंटाइन करण्यात आले आहे. सम्पर्कातील आणखी व्यक्तींचे लोकेशन ट्रेस करण्यात येत आहे. शहरात वाढत असलेल्या बाधितांच्या सन्खेमुळे नागरिक चांगलेच धास्तीत आले असून प्रशासनाचीही चिंता वाढतांना दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले