WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Breaking | यवतमाळ जिल्ह्यात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यु…पाच जण नव्याने पॉझेटिव्ह…सहा जणांना सुट्टी

Image

यवतमाळ, दि. 03 : शुक्रवारी केळापूर येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत मृत्युची संख्या 10 झाली आहे. तर जिल्ह्यात पाच जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व उपचाराअंती ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या सहा जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 155 रिपोर्ट प्राप्त झाले. यात सहा पॉझेटिव्ह, 148 निगेटिव्ह आणि एका रिपोर्टचे अचूक निदान झाले नाही. पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये केळापूर येथील मृतक महिलेचा समावेश आहे.

तर उर्वरीत पाच जणांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष आहेत. यात यवतमाळ शहरातील एक महिला, एक पुरुष तर नेर येथील दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.


गुरुवारी जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 63 होती. यात सहा पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने ही संख्या 69 वर पोहचली. मात्र एका पॉझेटिव्ह महिलेचा मृत्यु झाल्याने हा आकडा 68 वर आला. त्यातच आज (दि.3) सहा जण उपचाराअंती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्‍ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 62 आहे.
सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझे

टिव्ह रुग्णांची संख्या 304 वर पोहचली आहे. यापैकी तब्बल 232 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात दहा कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयासोलेशन वार्डात सद्यस्थितीत 84 जण भरती आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत 5213 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले. यापैकी 5137 प्राप्त तर 76 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4833 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.