WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात आणखी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या झाली सहा !

ImageImageImage

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात आणखी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता ६ झाली आहे.शहरात २० तारखेला मुंबईवरून आलेले दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्या संपर्कातील व्यंक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेऊन त्यांना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून एकूण ५९ व्यक्तींचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ३७ कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. २० रिपोर्ट येणे बाकी होते. आज आणखी एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या आता ६ वर पोहचली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्याही चिंतेत भर पडली आहे.३७ अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढणार नाही असे वाटत असतांनाच आणखी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याआता कोणता आकडा गाठेल या चिंतेने प्रशासनाबरोबरच शहरवासीयांनाही ग्रासले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले