WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दुचाकी अपघातात एक ठार तर एक गंभिर

Image

रस्त्यावरील दगडावर दुचाकी वाहन आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जख्मी झाल्याची घटना शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिंदोला चनाखा मार्गावर घडली. चनाखा गावातील दोन व्यक्ती काही काम निमित्त शिंदोला येथे गेले होते.काम आटपून दुपारी दोन वाजता गावाकडे परतत असतांना त्यांची दुचाकी रस्त्यावरील दगडावर आदळली त्यात मारोती रामा मडावी (३२) याच्या डोक्याला जबर नार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर किशोर सुरेश कोवे (२९) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचार करीता चंद्रपूरला रेफर करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले