WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अनं आणखी एक जोडपे लॉकडाऊन काळात विवाहबंधनात….

Image

वणी : सुरज चाटे
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व गर्दीचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे जुळलेले विवाह काहींनी समोर ढकलले तर काहींनी ठरलेल्या तारखेतच विवाह करण्याचा निर्णय घेतला. वणी तालुक्यातील माणकी येथे वधुचे पिता शंकर शेंडे यांनी लॉक डाऊनचे सर्व नियम पाळून आपल्या कन्येला नियमानुसार विवाह बंधन साध्या पध्दतीने केले. माणकी येथील वधू भाग्यश्री शेंडे व मार्डी येथील वर संदिप मोहुर्ले यांनी तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला प्राध्यान्य देत अगदी पंधरा ते विस जणांच्या उपस्थितीत कुठलाही खर्च व लोकांचा ओवा पोवा न करता साध्या सरळ पद्धतीने दिनांक 14 ला विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहे.
या विवाहाला वणी पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद वासेकर, पोलीस पाटील मीनाक्षी मिलमीले यांनी उपस्थिती दर्शवुन या नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद दिला, विवाह पंच के भवानी मांदाडे यांनी व आदी जिवा भावाच्या नातलग व आदींनी म्हटले भावी आयुष्यासाठी नव दाम्पत्यांना आपल्या घरातुनच आशीर्वाद द्यावा त्यानुसार माणकी ग्राम वासीयांनी आपल्या स्व गृहातूनच शासनाच्या नियमांचे पालन करीत मनोपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले